पालकमंत्र्यांनी स्वतः ऍम्ब्युलन्स चालवत केले लोकार्पण 

पालकमंत्र्यांनी स्वतः ऍम्ब्युलन्स चालवत केले लोकार्पण 

बुलडाणा 15 :  बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा मतदारसंघातील जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार निधीतून दोन सुसज्ज कार्डियक अंबुलन्सचे लोकार्पण देऊळगाव राजा येथे केलेय.
देऊळगाव राजा, सिंदखेडराजा या भागातील लोकांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याची बाब अनेकदा समोर येते. रुग्णवाहिका नसल्यामुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या आमदार निधीतून सिंदखेडराजा व देऊळगाव राजा अश्या प्रत्येकी एक रुग्णवाहिका मंजूर केल्या असून आज या सुसज्ज कार्डियक अंबुलन्सचे लोकार्पण स्वत:च चालवून केले आहे.
एम्बुलेंस मधे बसून पालकमंत्री शिंगणे यानी अम्बुलेंस मधील सुविधा जाणून घेतली.
error: Content is protected !!