तरूण शेतकऱ्यांनी केली किमया ,अर्ध्या एकरात घेतले ३० क्विंटलचे उत्पादन

तरूण शेतकऱ्यांनी केली किमया ,अर्ध्या एकरात घेतले ३० क्विंटलचे उत्पादन

गांगलवाडी  ( विनोद चौधरी) 18:  एकिकडे सुशिक्षित तरूण बेरोजगारी वाढली म्हणून बाेबंलत आहेत तर दुसरीकडे ग्रामीण भागातील काही युवक एकत्र येऊन आधुनिक शेती करून कुटुंबाचा गाडा हाकलत आहेत.कृषी पदवीकेचे शिक्षण घेऊन स्वतः आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत अर्ध्या एकरात ३० क्विंटल कारली पिकाचे उत्पादन घेण्या-या  बाेडधा येथील  राकेश ठाकरे या युवकाची कृषीगाथा  आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
ब्रम्हपुरी तालुक्याच्या दक्षिण टाेकावर बाेडधा गांव आहे. जेमतेम ८०० लाेकसंख्या असलेल्या या गावाला लागूनच वैनगंगा नदी आहे. या नदीनेच चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्याच्या सिमा विभागलेल्या आहेत. तर पश्चिमेस गावाला लागुन जंगल असल्यामुळे या गावात नेहमीच वन्यप्राण्यांच्या घटना घडत असतात. याच गावातील राकेश ठाकरे या युवकाने कृषी पदवीकेचे शिक्षण घेतले. यानंतर सरकारी नाैकरीसाठी प्रयत्न केले मात्र शेवटी निराशाच पदरी पडली. अशा परिस्थितीत या युवकाचे मनं शेतीकडे वळले. कृषी शिक्षण व साेबतचं शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड यातुनच या युवकाने तीन वर्षापुर्वी वडिलाेपार्जीत असलेल्या शेतीमध्ये कारल्यांची लागवड केली. अतीशय शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केल्यानंतर भरघोस उत्पन्न मिळाले व बाजारभावही मिळाला. यामधुनचं या युवकाचे मनाेबल वाढले. त्यामुळे या शेतकरी युवकाची प्रेरणा घेऊन गावातील काही युवकांनी आपापल्या वडिलाेपार्जीत शेतीवर पिक घेण्यास सुरवात केली. उत्पन्न व बाजारभाव याेग्य भेटल्याने या तरूण शेतकऱ्यांनी कारली पिकाची संकल्पनाच संपूर्ण गावात मांडली व तीन वर्षांपासुन हे गाव एकप्रकारे “कारल्यांचे हब” बनले आहे. यावर्षी गावात तब्बल सात एकरवर कारली पिकाची लागवड असुन राकेश ठाकरे या युवकाने आपल्या अर्धा एकर शेतीत तीस क्विंटल कारलीचे उत्पादन घेतले आहे.या पिकांसाठी अत्यंत काटेकाेर नियोजन या युवकाने केले आहे.  परिसरात सर्वाधिक लागवड ही कारली पिकाची असुन गटागटाने तरूण शेतकरी आपला माल टेम्पाेद्वारे ग्राहकांना पाेहचवित आहेत. कृषी विभागाने या गावाकडे लक्ष देऊन मार्गदर्शन करण्याचा आशावाद काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
कारल्याची बाजारपेठात मोठया प्रमाणात मागणी असल्याने  कारली पिकाची लागवड केली. सध्या काेराेनाने थैमान घातल्यामुळे बाजारभाव याेग्य भेटत नाही त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे .
error: Content is protected !!