महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या – आ. डॉ. देवराव होळी यांचे मतदारांना आवाहन

महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या – आ. डॉ. देवराव होळी यांचे मतदारांना आवाहन

गडचिरोली, ०४ एप्रिल :- भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय महायुतीचे लातूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा मोठे मताधिक्य देऊन निवडून द्यावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी दहेगाव येथील आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेच्या प्रसंगी केले.

आमदार डॉ. देवराव होळी मागील काही दिवसांपासून लातूर लोकसभा क्षेत्रातील निलंगा विधानसभा क्षेत्रात निरीक्षक म्हणुन कार्यरत आहेत.

error: Content is protected !!