राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि. कुलथे 5 जानेवारीपासून विदर्भाच्या दौऱ्यावर

राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि. कुलथे 5 जानेवारीपासून विदर्भाच्या दौऱ्यावर

गोंदिया येथे ५ जानेवारीला बैठक

गोंदिया, ०३ जानेवारी :- राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक तथा मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे हे येत्या पाच जानेवारीपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा हा दौरा दोन टप्प्यात होणार आहे. या दौऱ्यामध्ये ते संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महासंघाच्या राजपत्रित अधिकारी – महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन चर्चा करणार आहेत.

पहिला दौरा नागपूर विभागाचा होणार असून, बुधवार ५ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता भंडारा तर दुपारी ४ वाजता गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या दौऱ्यास सुरवात होणार आहे. गुरुवार, ६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूर येथील बैठक आटोपून दुपारी ४ वाजता गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील व गडचिरोली येथे त्यांचा मुक्काम असेल. शुक्रवार ७ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजता नागपूर जिल्हा परिषदेमध्ये महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल.

दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात कुलथे अमरावती विभागात बुधवार, १२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अकोला तर दुपारी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात राजपत्रित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. गुरुवार, १३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता वाशिम आणि दुपारी ४ वाजता यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात तर शुक्रवार १४ जानेवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत दुपारी ३ वाजता त्यांची बैठक होईल. या दौऱ्यात कुलथे अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बाबींसह विविध विषयांवर संवाद साधणार आहेत.

error: Content is protected !!