अकोल्यात ४ दरोडेखोरांना प्राणघातक शस्त्रासह पोलिसांनी केली अटक

अकोल्यात ४ दरोडेखोरांना प्राणघातक शस्त्रासह पोलिसांनी केली अटक

अकोला, २३ मार्च :– दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या चार सर्राइत गुन्हेगारांना प्राणघातक शस्त्रासह शहरातील चांदेकर चौक मधून अटक केली असून त्यांच्याकडून 2 लोखंडी रिव्हाल्वर सदृश्य शस्त्र व 10 लोखंडी तलवार चाकू शस्त्र जप्त केले आहे. सदर कारवाई अकोला पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली आहे.

२२ मार्च रोजी पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकास मिळालेल्या ख़बरेवरुन, चांदेकर चौक मधील बैंक ऑफ इंडिया समोर काही इसम हे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रिव्हाल्वर, पिस्तौल व तलवारी चा धाक दाखवून जबरी चोरी दरोडा घालण्याच्या तयारित आहेत. त्यांच्या जवळ प्राणघातक शस्त्रे ही आहेत. अशा खात्रीशीर ख़बरेवरुन पंचा समक्ष छापा मारला असता 4 सराइत गुन्हेगार घटनास्थळी रंगेहाथ मिळून आले.

त्यांच्या जवळून 2 अग्निशस्त्र सारखे पिस्तौल, रिव्हाल्वर, लोखंडी कट्टे ज्यात 06 राउंड जीवंत काडतुस सदृश्य दिसुन आले. तसेच 10 प्राणघातक शस्त्र ज्यात 4 तलवार, कोयता, सूरी, चाकू, भाला, लोखंडी रॉड, 2 कत्ते, फायटर, तसेच नायलॉन दोरी, मिरची पूड, असे दरोडयाच्या तयारित असलेले चार आरोपी जागेवरच रंगेहाथ मिळून आले. त्यांच्यातील एक महिला साथीदार गर्दीचा फायदा घेवून फरार झाली. 4 अरोपितांची सराइत गुन्हेगारांची नावे 1) दीपक रामु अंभोरे (40) रा. मुल्लानी चौक खदान 2) नितेश महादेव वाकोडे (44) रा. रमाबाई नगर 3) शुभम संजय गवई (20) रा. इराणी झोपड़पट्टी 4) अनिल दादाराव भालेराव (22) रा. HDFC बैंक समोर अकोला 5) फरार महिला ममता अनिल गवारगुरु (35) रा. अकोटफाइल या आरोपी विरुद्ध दरोड़याची शस्त्रानिशि तयारी केल्याने पिस्तौल, रिव्हाल्वर, काडतुस सह विनापरवाना प्राणघातक शस्त्र सोबत बाळगून गुन्हा करतांना मिळून आल्याने व त्यांच्या विरुद्ध अकोला शहरात मालमत्ते विरुद्ध चोरी जबरीचोरी घरफोडी चे 22 गुन्हे वेगवेगड़े पोलिस स्टेशन येथे दाखल आहेत. यावरून वरील आरोपींविरुद्ध भादंवि कलम 399, 402 कलमानवये पो.स्टे. सिटी कोतवाली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक जी श्रीधर, अपर पोलिस अधिक्षक मोनीका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!