आ. सुलभाताई खोडके यांचे वाढदिवसानिमित्य हार्दिक अभिष्टचिंतन

आ. सुलभाताई खोडके यांचे वाढदिवसानिमित्य हार्दिक अभिष्टचिंतन

शुभेच्छा देण्यासाठी अमरावतीकर नागरिकांची निवासस्थानी गर्दी

सर्वांची भेट व शुभेच्छा स्वीकारत आ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केली कृतज्ञता

अमरावती, 19 सप्टेंबर :- अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या १८ सप्टेंबर वाढदिवसानिमित्य त्यांना शुभेच्छा देत अभिष्टचिंतन करण्यासाठी गाडगे नगर स्थित निवासस्थानी हजारो नागरिकांनी गर्दी केली. यावेळी आमदार महोदयांनी सर्वांची भेट घेऊन, शुभेच्छाचा स्वीकार करत सर्वांप्रती आभार व कृतज्ञता व्यक्त केली.

मागील दोन वर्ष कोरोनाचे संकट उभे असल्याने आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी आपला वाढ दिवस साजरा न करण्याचे ठरविले होते. मात्र यंदा कोरोना नंतर प्रथमच आ. सौ. सुलभाताई खोडके यांचा वाढदिवस आल्याने रविवार १८ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच सर्व स्नेहीजण व हितचिंतकांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी एकच गर्दी केली. यावेळी महिला वर्गासह युवा मंडळींची विशेष उपस्थिती होती. तसेच शहराच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा, उद्योग, प्रशासन, पत्रकारिता, सहकार, महिला बचत गट आदी क्षेत्रातील मान्यवरांसह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच अमरावतीकर नागरिकांनी सुद्धा आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांचे वाढदिवसा निमित्य शुभेच्छा देत हार्दिक अभिष्टचिंतन केले.

आ. सौ. सुलभाताई खोडके यांना संपूर्ण राज्यभरातून भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा प्राप्त झाल्या असता आमदार महोदयांनी सर्वांशी संवाद साधून शुभेच्छाचा स्वीकार केला. तसेच नेटींजन्स हितचिंतकांनी सुद्धा अमरावतीच्या आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरून शुभेच्छा व्यक्त केल्यात. वाढदिवसानिमित्य शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व हितचिंतक व स्नेहीजणांना भेटून, त्यांच्या शुभेच्छाचा स्वीकार करीत व संवाद साधून आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्वांप्रती आभार व कृतज्ञता व्यक्त केली.

error: Content is protected !!