श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचा आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते सत्कार

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचा आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते सत्कार

संस्थेच्या प्रगतीसाठी आपण सदैव शिवपरिवारा सोबत – आ. सौ. सुलभाताई खोडके

अमरावती, २० सप्टेंबर :- श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झाल्या बद्दल माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांचा अमरावती विधान सभा मतदार संघाच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

नुकत्याच झालेल्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीतील हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनल ने दमदार विजय मिळावीत संस्थेवर एकहाती सत्ता मिळविली. संस्थेच्या कार्यकारिणीतील एकूण ९ जागांपैकी ८ जागा प्रगती पॅनल ने जिंकल्या असून यात अध्यक्ष पदी हर्षवर्धन देशमुख दुसऱ्यांदा निवडून आले. शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजित झाल्या बद्दल माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांचा अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत अभिनंदन केले. तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांचा देखील विजयी झाल्याबद्दल आमदार महोदयांनी सत्कार करीत नूतन कार्यकारणी मंडळाला शुभेच्छा दिल्या.

बहुजनांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी म्हणून शिक्षण महर्षी, कृषी महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आपणही शिव परिवारातील एक सदस्य असून श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतल्याचा आपल्याला अभिमान आहे. शिक्षण क्षेत्रात शिवाजी संस्थेचा मोठा नाव लौकिक असून गेल्या पाच वर्षातील कार्यकारणी मंडळाचे कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. आजीवन सभासद व शिव परिवाराचा विश्वास नूतन कार्यकारणी मंडळ नक्कीच सार्थ ठरवणार असून संस्थेला आपली सर्वोतोपरी साथ राहणार आहे. भाऊसाहेबांच्या विचारातून संस्थेच्या प्रगतीचा आलेख असाच वृद्धिंगत व्हावा, यासाठी आपण सदैव शिवपरिवारा सोबत असल्याचा मनोदय आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केला.

पंचवटी चौक शिवाजी नगर स्थित संस्थेच्या मुख्य कार्यालय येथील सत्काराप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ता तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके, माजी महापौर ऍड. किशोर शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, अशोकराव हजारे, जितेंद्रसिंह ठाकूर, मनोज केवले, गजानन बरडे, संजय बोबडे, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, निलेश शर्मा, प्रमोद महल्ले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, शक्ती तिडके, बंडू निंभोरकर, किशोर भुयार, प्रवीण भोरे ,किशोर देशमुख, अमोल देशमुख, संकेत बोके, सूरज आढाळके, जयेश सोनवणे, अनिकेत मेश्राम, प्रथमेश बोके, प्रा. डॉ. अजय बोण्डे, आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!