वाचन संस्कृती जोपासण्यासाठी खुले वृत्तपत्र वाचनालय म्हणजे स्तुत्य उपक्रम – आ. सुलभा खोडके यांचे प्रतिपादन 

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी खुले वृत्तपत्र वाचनालय म्हणजे स्तुत्य उपक्रम – आ. सुलभा खोडके यांचे प्रतिपादन 

स्वामी विवेकानंद खुले वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन

बाबा फाउंडेशन अंतर्गत ज्येष्ठ नागरिक व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना उपयुक्त सुविधेचा लाभ

अमरावती, १२ ऑक्टोबर :- स्वर्गीय विनायकराव खवले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन खवले कुटुंबियांचे वतीने खुले वृत्तपत्र वाचनालय हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुक, लॅपटॉप, इंटरनेटच्या तांत्रिक युगात विद्यार्थी तंत्रस्नेही होत आहे. थोर महापुरुषांच्या विचारांची महती कळण्यासाठी पुस्तके, वृत्तपत्रे वाचन सुद्धा गरजेचे आहे. थिमपार्क येथे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. याच शृंखलेत खुले वाचनालय या नव्या उपलब्धीमुळे ज्येष्ठ नागरिक व शहरी-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दैनंदिन वाचना करिता एक नवे दालन उपलब्ध झाले आहे. यामुळे शासनाच्या लोककल्याणकारी योजना, शासन निर्णय, आदींसह वैविध्यपूर्ण माहितीचा लाभ स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. खुल्या वातावरणात येथे बसल्यावर ऊन,वारा व पाऊस यापासून सरंक्षण व्हावे व वाचनाकरिता आलेल्या नागरिक-विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगामी काळात टिन शेड उभारण्यात यावा. याकरिता आपण कटिबद्ध आहोत. याकरिता आपले सर्वोच्च प्राधान्य असून वाचनप्रिय संस्कृती जोपासना करणाऱ्या या उपक्रमाला चालना देण्यासाठी आपले सदैव तत्पर सहकार्य राहील. असा विश्वास याप्रसंगी आपण देत आहो. उपरोक्त प्रतिपादन आमदार सौ. सुलभा संजय खोडके यांनी व्हिएमव्ही मार्ग-विलास कॉलोनी परिसर समीपच्या स्वामी विवेकानंद थिमपार्क येथे बाबा फाउंडेशन अंतर्गत स्वामी विवेकानंद खुले वृत्तपत्र वाचनालय उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधून केले.

महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संस्थापक उपाध्यक्ष-स्वर्गीय विनायकराव खवले यांच्या पुण्यस्मरणानिमित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक तथा श्री संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक आमदार सौ. सुलभा खोडके या उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र आडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक प्रशांत डवरे, माधुरी खवले, रिता मोकलकर, पुरुषोत्तम गावंडे, प्रमोद खवले, यश खोडके, स्वामी विवेकानंद क्रिडा मंडळाचे अध्यक्ष अमित मस्करे, प्रशांत महल्ले, संदीप खवले आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम आमदार सौ. सुलभा खोडके यांनी फित कापून कार्यक्रमाची औपचारिकता साधली. तद्नंतर अतिथींच्या हस्ते स्वर्गीय विनायकराव खवले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी खवले कुटुंबीय व स्थानिक नागरिकांच्या वतीने सर्व अतिथींचे यथोचित स्वागत करण्यात आले. खुले वाचनालय हा एक अभिनंदनीय उपक्रम आहे, थिमपार्क म्हणजे स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेले विचार समाजात रुजवायचे आहे. संदीप खवले यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यात भर टाकली आहे. या शब्दात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अन्य अतिथी मान्यवर यांची समयोचित भाषणे झालीत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जुनघरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खवले यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, मारोती गणोरकर, अरुण घाटोळ, जी.के. आजनकर, अरुण दहिकर, घनश्याम डूमरे, हरिभाऊ पांडे, प्रा. डॉ. सुरेंद्र दाळू, रविंद्र भांगे, विनायक चिमोटे, आर.आर. मडघे, मेघराज खवले, पंकज लहाने, डी.आर. आमले, डॉ. क्रांतिकुमार आमले, बाळू काळे, प्रदीप दिवाण, सचिन कापसे, मंगेश ठाकरे, शुभम यावले, सौरभ पाटील, प्रसाद देशमुख, सुरेंद्र बनसोड, सुभाष वलके, अशोक हांडे, नारायणराव वानखडे, प्रकाश कुबडे, प्रजवल घोम, छोटू खंडारे, बबलू ढोरे, राजेंद्र टाके, सचिन दळवी, अभिजित लोयटे, नानाभाऊ चौधरी, संकेत बोके, राजेश कुचे, निनाद कोंडे, अथर्व खवले, श्रेयस टाकले, दर्शन देशमुख, प्रसाद देशमुख, विशारद कोंढे, संदीप खवले, प्रमोद खवले, संदीप जुनघरे, देवेंद्र वाडी, मारोती गणोरकर, मेघराज खवले, रवींद्रपंत भांगे, विठ्ठलराव गणोरकर, हेमंत बेलोकार, योगिता गुप्ता, सरोज चिमोटे, माधुरी खवले, वंदना खवले, सानिका भांगे, उज्ज्वला भांगे, योगिता खवले, समीक्षा भांगे, आकांक्षा भांगे, उज्वला भांगे, कल्पना कोंडे, प्रभाताई बाडी, दीपाली देशमुख, श्रेया खवले, अंजली जुनघरे, आदींसह अन्य आमंत्रित सदस्य व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!