सुरक्षा कवच विमा योजनेचा शुभारंभ

सुरक्षा कवच विमा योजनेचा शुभारंभ

वाशीम, २४ डिसेंबर :- बुलढाणा येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या केंद्रीय बैठकीत ‘पत्रकारांची आरोग्य मोहीम’ या कार्यक्रमांतर्गत ‘कवच पॉलिसी’चे वाटप करण्यात येणार आहे़ येत्या सहा महिन्यांत राज्यातल्या प्रत्येक पत्रकाराला ही ‘कवच पॉलिसी’ मिळावी, अशी आखणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने करण्यात आली आहे.

त्यानुसार वाशीम येथे पार पडलेल्या बैठकीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष अनिल मस्के, राज्य संघटक सुधीर चेके पाटील, विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटिक यांच्या मार्गदर्शनात २३ डिसेंबर रोजी प्रात्यनिधीक स्वरुपात पत्रकारांचा विमा उतरवून वाशीम जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांनी या विधायक कामाचा शुभारंभ केला.

error: Content is protected !!