‘व्हॉईस ऑफ मीडिया‘चे सदस्य, पत्रकार व पत्रकारांचे कुटुंब यांना 10 लाख रुपयांच्या ‘सुरक्षा कवच पॉलिसी‘ नोंदणीचा शुभारंभ

‘व्हॉईस ऑफ मीडिया‘चे सदस्य, पत्रकार व पत्रकारांचे कुटुंब यांना 10 लाख रुपयांच्या ‘सुरक्षा कवच पॉलिसी‘ नोंदणीचा शुभारंभ

बुलढाणा, १७ डिसेंबर :- ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘चे सदस्य, पत्रकार व पत्रकारांचे कुटुंब यांना १० लाख रुपयांच्या ‘सुरक्षा कवच पॉलिसी‘ नोंदणीचा शुभारंभ आज बुलढाणा येथून झाला. येत्या २५ डिसेंबरला बुलढाणा येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या केंद्रीय बैठकीत, ‘पत्रकारांची आरोग्य मोहीम‘ या कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘कवच पॉलिसी‘चे वाटप करून सुरुवात केली जाणार आहे. येत्या सहा महिन्यांत राज्यातल्या प्रत्येक पत्रकाराला ही ‘कवच पॉलिसी‘ मिळावी, अशी आखणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ च्या वतीने करण्यात आली आहे.

‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ चा प्रत्येक पदाधिकारी, समाजाचा मुख्य घटक असणाऱ्या त्या सर्व पत्रकारांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ चे राज्य उपाध्यक्ष अनिल मस्के, राज्य संघटक सुधीर चेके पाटील, बुलढाणाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बागडे यांनी सर्वात प्रथम या कामासाठी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!