डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनीचे आयोजन 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनीचे आयोजन 

गडचिरोली, २४ डिसेंबर :- डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२४ व्या जयंती दिनानिमित्य २७ ते ३१ डिसेंबर, २०२२ दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या क्रिडांगणावर राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत राज्यस्तरीय भव्य कृषि प्रदर्शनीचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ व कृषि विभाग महाराष्ट्र शासन, प्रकल्प संचालक, आत्मा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनीत फळबाग, भाजीपाला, फुलशेती, वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, ऊस, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषि अभियांत्रिकी इत्यादी विभागाचे दालने तसेच इतर सलंग्न संस्था, कृषि निविष्ठा व कृषि औजारे यांची दालने सुध्दा राहणार आहे. २७ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान दररोज दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान शास्त्रज्ञ शेतकरी सुसंवाद, प्रगतीशील शेतकऱ्यांचे मनोगत व मान्यवरांच्या संबोधनाचे आयोजन करण्यात येत आहे.

याशिवाय शेतकरी बंधु व भगिनींचे कृषि आधारीत ग्रामीण उद्योगाची जोडधंदे दालने या प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या प्रदर्शनीतील कृषि पुरक व्यवसाय दालने तथा कृषि प्रक्रिया उद्योगातील दालने प्रदर्शनीस भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादाई तसेच शेतकऱ्यांचे मनोबल उंचविण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. हि दालने या कृषि प्रदर्शनीतील मुख्य आकर्षण आहे. या शिवाय गट शेती, करार शेती, स्वयं सहायता बचत गटांच्या यशोगाथा, महिला बचत गटांनी उत्पादीत केलेले कृषि आधारीत उत्पादने, शेतकऱ्यांनी तयार केलेली नाविन्यपूर्ण शेती अवजारे इत्यादींची अभिनव दालने सुध्दा उपलब्ध राहणार आहेत. एकंदरीत या प्रदर्शनीत ३०० च्या जवळपास दालणे उपलब्ध राहणार असून ही कृषि प्रदर्शनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

सर्व शेतकरी बंधु-भगिनी, कृषिशी निगडीत मंडळीनी या कृषि प्रदर्शनीचा लाभ घ्यावा तसेच आपल्या संपर्कातील शेतकरी बंधु-भगिनींना प्रोत्साहीत करण्यात यावे असे आवाहन डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला तसेच संदिप एस. कऱ्हाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांनी केले आहे.

error: Content is protected !!