एक हजाराची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंत्याला अटक

एक हजाराची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंत्याला अटक

वर्धा, २८ फेब्रुवारी :- देवळी तालुक्यातील अडेगाव येथील 33 केव्ही वीज वितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंत्याला त्यांचे कार्यालयात विज मीटर लावण्यासाठी शेतकऱ्याकडून एक हजार रुपयांची लाच घेणे महागात पडले असुन वर्धेच्या लाच लुचपत विभागाने लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता वासुदेव पारसे (वय ५७) यांना रंगेहाथ पकडले.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार शेतकरी यांची गौळ येथे सर्वे 80 आराजी 4.05 हेक्टर शेती आहे. या शेतामध्ये सिंचनासाठी कॅनलवरुन ओलीताकरीता पाणी घेण्याकरिता शेतात लवकर विद्युत मिटर लावण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांकडून 1000 रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी वर्ध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून आज नागपुर येथील पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर याच्यां मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक डी.सी. खंडेराव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संदिप थडवे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बावनेर, पोह संतोष बावणकुळे, पोशि कैलास वालदे, प्रितम इंगळे यांच्या चमूने कारवाई करून कनिष्ठ अभियंता कार्यालयातच लाच घेताना रंगेहाथ अटक केली. आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

error: Content is protected !!