शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत विदर्भातून सुरू होत आहे ‘शिवगर्जना अभियान’

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत विदर्भातून सुरू होत आहे ‘शिवगर्जना अभियान’

२६ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान विदर्भ दौरा 

चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात होणार बैठका

गडचिरोली/चंद्रपूर, २५ फेब्रुवारी :- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यभर शिवगर्जना अभियान सुरू झाले आहे. २५ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान या मोहिमेत शिवसेना पदाधिकारी जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे मार्गदर्शन करतील.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे रविवार, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता कुरखेडा  येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यास मार्गदर्शन, त्यानंतर सायंकाळी गडचिरोली येथे शिवसेना पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करतील. सोमवार, २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजता चामोर्शी येथे शिवसैनिक मेळावा व मार्गदर्शन, चामोर्शीहुन चंद्रपूरकडे रवाना, सायंकाळी एसटी वर्कशॉप चंद्रपूर येथे शिवसैनिक मेळाव्यास मार्गदर्शन करतील. मंगळवार, २८ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सकाळी ११:३० वाजता राजुरा येथे शिवसैनिक मेळाव्यात मार्गदर्शन, त्यानंतर ४ वाजता भद्रावती, वरोरा येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतील.

error: Content is protected !!