नक्षलवाद्यांनी खोटारडेपणाची परिसीमा गाठली

नक्षलवाद्यांनी खोटारडेपणाची परिसीमा गाठली

भरकटलेल्या कांतीची असत्या वचने…

आदिवासी बांधवांना अविकसित, अज्ञानी ठेवण्याचे सर्वात जास्त श्रेय नक्षलवाद्यांना द्यावे लागेल, कारण खोटारडी विधाने, दिशाभूल करणारी विषारी विचारसरणी, थाक, बळजबरी करून नेहमीच वास्तविकतेपासून कोसो दूर असणारी नक्षली प्रवृत्ती. पण येथील जनता मुळ प्रवाहात येतेय, विकसित होतेय, शिक्षण घेत आहे, हेच मुळी या नक्षलवाद्यांच्या पचनी पडत नाही. यांच्यात अस्वस्थता वाढते मग हे सुरू करतात असत्य, खोटारडी विधाने नक्षलवादी सांगत आहेत की, हिक्केर मध्ये पोलीस नक्षल चकमकीत पोलीसांचे देखील नुकसान झाले आहे तरी पण पोलीस खरी माहिती देत नाहीत. तर त्यांच्या या खोटारडेपणाला गडचिरोली पोलीस दल सांगू इच्छिते की, चकमकीदरम्यान स्वतःच्या साथीदाराला मरताना सोडून भ्याड सारखे पळून जातात आणि पोलीसांचे नुकसान झाल्याची खोटी बातमी प्रसारीत करता. तुमची बोगस क्रांती शेवटच्या घटका मोजत आहे, तुमचे मनोबल खच्चीकरण झाले आहे त्यामुळे खोट्यानाट्या अफवा पसरवून जनतेची दिशाभुल करण्याचे कारस्थाने तुम्ही करत आहात. नक्षल्यांनो तुम्ही किती खोटारडे आहात हे सर्व जनतेला माहीत आहे. तुमच्या माहितीसाठी चकमकीत जिवंत नक्षल पकडून अमानविय प्रकारे मारणे हे पोलीसांचा तत्वात नाही आम्ही तर शत्रु शरण आल्यावर त्याला जीवनदान देतो. उदारहरण द्यायचे झाले तर सन २०२१ मध्ये याच गडचिरोली पोलीस दलाने खोब्रामेंढा चकमकीत जखमी नक्षल किशारे कवडोला नागपूर मध्ये पंचतारांकित हॉस्पीटलमध्ये २ लाख रु. खर्च करून त्याचे प्राण वाचविले आहे. तसेच दि. २३-१२-२०२२ रोजी टेकामेडा (बिजापुर, छत्तीसगड) चकमकीत जखमी झालेल्या तुमच्या नक्षल साथीदाराला हेलीकॉप्टर द्वारे नागपुर येथे नेले व त्याच्यावर उत्कृष्ट उपचार केले आहेत. तुमच्या सारखे निष्पापांच्या हत्यांनी आमचे हात बरबटलेले नाहीत. वरुन न्यायालय, कायद्याच्या बाता मारता, पण ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकारांनी संविधानिक मार्गाने, लेखणीच्या माध्यमातून, संघर्ष करण्याची प्रेरणा दिली, त्या मार्गाने तुम्ही चळवळ करा, ना की, माओच्या हिंसक विचाराने प्रेरित होवुन, बंदुकी हाती घेवून लढा द्या. जनतेच्या लक्षात आले की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकारांच्या लेखणीच्या माध्यमातून खरी समाजाची क्रांती होवु शकते, माओच्या हिंसक विचाराने नाही.

राहीला विषय आमच्या पोलीस दलाचे नुकसान झाल्याचा तर या चकमकीत आमच्या एकही जवानाला साधे खरचटलेले सुध्दा नाही, शहीद तर खुप दुरची गोष्ट आहे. आमचा प्रत्येक शहीद जवान आमच्या शीर्याचे त्यागाचे प्रतिक आहे. आम्ही तुमच्यासारखे परस्पर अंत्यसंस्कार करत नाहीत, आमच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडत नाहीत तर एक पोलीस कुटुंब म्हणून सर्वोतपरी काळजी घेतो, त्यांच्या प्रत्येक सुख-दुखात सहभागी होतो, त्यांच्या प्रत्येक अडीअडचणी सोडवतो. देशासाठी प्राणार्पण केलेल्या प्रत्येक शहीद जवानांचा त्याग, त्यांचे बलिदान आम्हाला कायम स्मरणात आहे. तुमच्यासारख्या देशद्रोह्यांशी लढतांना वीर मरण आलेल्या प्रत्येक जवानांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हाला तुमच्यासारखी असत्याची कास धरण्याची गरज नाही आम्ही सत्येच्या वाटेवर चालणारे भारतभूमीचे वीर त्याग बलिदान आमच्या नसानसात भिनलेले आहे. त्यामुळे आमचे जवान चकमकीत पुत्र आहोत, शहीद किंवा जखमी झालेल्याची माहिती न देण्याची आम्हाला गरज नाही. आतापर्यंत नक्षलवादयांच्या भ्याड हल्ल्यात गडचिरोली पोलीस दल व इतर सुरक्षा दलाचे २१२ जवान शहीद झाले आहेत. त्यातील प्रत्येक शहीद जवानांची शौर्यगाथा स्मृतीस्थळात आम्ही तेवत ठेवली आहे. आम्हाला प्रत्येकाच्या त्यागाची जाणीव आहे त्यांचे बलिदान आम्हाला धाडसी बनविते. आम्ही कृतज्ञ आणि नतमस्तक आहोत त्यांच्या शौर्यापुढे…

error: Content is protected !!