अंजली खोब्रागडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

अंजली खोब्रागडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

गडचिरोली, ०५ ऑगस्ट :- शहरातील सर्वोदय वार्ड येथील रहिवासी कै. रामजी खोब्रागडे माजी सरपंच गडचिरोली यांची नात व रवींद्र खोब्रागडे यांची मुलगी अंजली खोब्रागडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी ओबीसी प्रवर्गातून निवड झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील पहिलीच व्यक्ती पोलीस प्रशासनात निवड झाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

अंजली यांचे बीकॉम पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचं हा स्वतःलाच पडलेला प्रश्न? त्यात पुढील पदव्युत्तर पदवी एमकॉम ला प्रवेश घेतला, परंतु वडील प्रशासकीय सेवेत असल्यामुळे लहानपणीपासून प्रशासकीय सेवेत येण्याची आवड होती. एके दिवशी वर्तमानपत्रांमध्ये राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागण्याची बातमी वाचली. त्यात पुणे शहरात अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तेव्हाच मला वाटलं की आपणही पुण्याला जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. माझ्या वडिलांनी पुण्यातील खाजगी शिकवणीची माहिती घेतली व मला अभ्यासा करता पुणे शहर येते पाठवले. पुण्यात खाजगी शिकवणी ला प्रवेश घेतला व तिथून माझ्या स्पर्धा परीक्षेचा प्रवासाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी मला स्पर्धा परीक्षेचा आवाका समजण्यातच वेळ गेला. 2019 यावर्षीच्या परीक्षा चांगली तयारी केली पण पूर्व परीक्षाच नापास झाली. या पूर्व परीक्षेत झालेल्या चुका दुरुस्त करून पुढील वर्षीची 2020 ची तयारीला सुरुवात केली. परीक्षा येणारच तेवढ्यात जागतिक महामारी (कोरोना) ला सुरुवात झाली. एक वर्ष जग थांबले होते, परंतु मी अभ्यासात सातत्य ठेवून अभ्यास करत राहिले. लॉकडाऊन उठल्यानंतर माझी पूर्व परीक्षा झाली. त्यात मी चांगले गुण मिळवत उत्तीर्ण झाली व मुख्य परीक्षेला पात्र झाले. मुख्य परीक्षेकरिता कायदा हा विषय माझ्यासाठी नवीन होता. तो मी अभ्यास करणारे मित्रांसोबत चांगला शिकून घेतला. मुख्य परीक्षेला चांगले गुण मिळवल्यामुळे मी शारीरिक चाचणी व मुलाखती याकरता पात्र झाले. 19 जुलै 2023 रोजी अंतिम निकाल लागला त्यात माझी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. याच दरम्यान मला महाज्योती या राज्य शासनाच्या संस्थेतर्फे विद्यावेतन योजना मिळत होती. पोलीस प्रशासनामध्ये मला स्वच्छ व कार्यक्षम अधिकारी म्हणून काम करायचे असून माझ्याकडे येणारा प्रत्येक नागरिक परत जाताना समाधान कसा जाईल याकरिता शत प्रतिशत काम करायचे आहे, असे मनोगत अंजली खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी व मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मुलींनी युनिफॉर्म सर्विसेस मध्ये कसे जावे ती मुलीसाठी नाहीच असा समज आहे. अंजली यांनी संपादन केलेल्या यशामुळे हा समज मोडीत निघाला असून युवा मुलींकडे एक यशस्वी उदाहरण म्हणून समोर आला आहे.

error: Content is protected !!