आदिवासी समाजाच्या हितासाठी झटणाऱ्यांच्या पाठीशी राहा – आ. डॉ. देवराव होळी यांचे आवाहन

आदिवासी समाजाच्या हितासाठी झटणाऱ्यांच्या पाठीशी राहा – आ. डॉ. देवराव होळी यांचे आवाहन

समुद्रपुर येथे आदिवासी मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून उपस्थिती 

गडचिरोली, २१ नोव्हेंबर :- भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्र सरकारने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती १५ नोव्हेंबर हा गौरव दिवस म्हणून घोषित करून संपूर्ण देशामध्ये भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहाने साजरी करण्याची परंपरा सुरू केली व आदिवासी समाजाचा सन्मान व गौरव वाढवला आदिवासी समाजाच्या हितासाठी झणाऱ्यांच्या पाठीशी आदिवासी समाजाने खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे आयोजित आदिवासी मेळाव्याच्या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून बोलताना केले.

यावेळी मंचावर हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार, वर्धा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे प्रदेश महामंत्री नितीन मडावी, समुद्रपूरचे तहसीलदार कपिल हाटकर, दिपक हेडाऊ प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास, जिल्हा भाजपा अ.ज. अध्यक्ष शंकर आत्राम, वि.स. प्रभारी मोहन तुमराम, विधानसभा प्रभारी आर्वी विजय वाळवे, तालुका अध्यक्ष सुनील करणाके, ता. उपाध्यक्ष विठ्ठल गेडाम, शहर अध्यक्ष शंकर पेंदोर, संजय मडावी, संजय सयाम, नरेश उईके, रवी कुकर्डी, विशाल आत्राम, बादल मसराम, यादवराव मडावी, सिलू ता. अध्यक्ष गजानन परतेकी यांचेसह विविध आदिवासी संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांशी आदिवासी समाजाच्या धर्मांतरणाच्या विरोधामध्ये मोठी लढाई लढली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्यांचा त्याग आपल्यासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्याची आज वेळ आली असल्याचे ते म्हणाले. आदिवासी परंपरांचा त्याग करून धर्मांतर करणाऱ्या लोकांना आदिवासी समाजातून डीलीस्टिंग करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी २१ नोव्हेंबरच्या आदिवासी समाजाच्या डी-लिस्टिंग संदर्भात होणाऱ्या नागपुर येथील महामोर्चाला आपण सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. डॉ. होळी यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!