धक्कादायक घटना : जावयाने पत्नी, सासऱ्यासह दोन मेहुण्यांची केली हत्या

धक्कादायक घटना : जावयाने पत्नी, सासऱ्यासह दोन मेहुण्यांची केली हत्या

यवतमाळ, २० डिसेंबर :- जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयाने त्याची पत्नी, सासरा आणि दोन मेहुणे अशा चार जणांची निर्घृण हत्या केली. कळंब तालुक्यातील तिरझडा येथील पारधी बेड्यावर मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या घटनेने यवतमाळ हादरले आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

यवतमाळच्या पारधी बेड्यावर ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबियांच्या मुलीशी आरोपीचे लग्न झाले होते. या लग्नाच्या काही वर्षानंतर आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरूवात केली होती. या संशयातून पती-पत्नीमध्ये नेहमीच खटके उडायचे. तर घटनेच्या दिवशी आरोपी जावई हा दारू पिऊन आला होता. त्यामुळे त्याचा पुन्हा पत्नीशी वाद झाला. या वादातूनच त्याने पतीने बायकोचे कुटुंब संपवण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपी जावयाने सबलीच्या सहाय्याने बायकोच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. आरोपीने सबलीने थेट छातीत हल्ला केला. या हल्ल्यात बायको रेखा गोविंद पवार, सासरा पंडित घोसले, मेहूणा ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सासू रुखमा घोसले या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तत्काळ उपचाराखातर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत.

या हत्याकांडाची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आणि घटनास्थळावरून आरोपी जावई गोविंद विरचंद पवार याला ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी  चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यू कारण समोेर येणार आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपासही सुरु केला आहे.

error: Content is protected !!