मार्चमध्ये तब्बल १४ दिवस बँका राहणार बंद!

मार्चमध्ये तब्बल १४ दिवस बँका राहणार बंद!

गडचिरोली, २५ फेब्रुवारी :- फेब्रुवारी महिना संपत आला आहे. मार्च २०२४ मध्ये एकूण १४ दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. यामध्ये महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणाऱ्या सुट्यांचाही समावेश आहे. यामुळे जवळपास अर्धा महिना बँका बंद राहणार असल्याने सर्वसामान्य नागरीकांची गैरसोय होणार आहे.

मार्च महिन्यात होळीचा सण आहे. २५ मार्चला होळीनिमित्त देशभरात सार्वजनिक सुट्टी असेल. देशभरातील सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणांदिवशी सुट्टया असतात आणि स्थानिक सणांनुसार बँका बंद राहतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चमधील सर्व रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेने १, ८, २२, २५, २६, २७ आणि २९ मार्च रोजी बँकांना सुझ्या जाहीर केल्या आहेत. मार्चमध्ये ५ रविवार येतात म्हणजेच ३, १०, १७, २४ आणि ३१ मार्च रोजी बँकांमध्ये नियमित सुट्ट्या असतील. महाराष्ट्रात महाशिवरात्री, होळी, गुड फ्रायडे या निमित्त बँकांना सुट्टी असेल. याशिवाय सर्व रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

आजकाल बँकिंग व्यवहार पूर्णपणे डिजिटल झाले आहे. अशा स्थितीत बँका बंद केल्याने छोट्या व्यवहारांवर काही फरक पडणार नाही. कारण, युपीआय पेमेंट सिस्टम आहे. मात्र, काही कामासाठी बँकेत जावे लागते. अशा परिस्थितीत, सुट्टीबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. बँकांच्या सुट्टीच्या तारखा तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.Rbi.org.in तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!