पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार पीएम उषा प्रकल्पाचे डिजिटल लॉन्चिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार पीएम उषा प्रकल्पाचे डिजिटल लॉन्चिंग

प्रकल्पाच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटींचा निधी

गडचिरोली, २० फेब्रुवारी :- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम – उषा) योजनेला मंजुरी दिली आहे, त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, याचे २० फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लाँचिंग होणार आहे. यावेळी ते ऑनलाइन संवादही साधणार आहेत.

तत्पूर्वी सकाळी ११ वाजता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे संबोधित करणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आभासी पद्धतीने उपस्थित राहतील. शहरातील सुमानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

error: Content is protected !!