एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

भंडारा, २६ एप्रिल :- शहरातील जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोल पंप व पिपरी पुनर्वसन येथील दोन दुकाने आणि भंडारा पोलीस स्टेशन आणि अंतर्गत येणाऱ्या भंडारा शहरातील सात दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना २२ एप्रिलच्या मध्यरात्री घडली होती.
या चोरीच्या घटनेतील आरोपी मधुन तीन आरोपींना (एक विधी संघर्ष बालक) पकडण्यात जवाहरनगर पोलिसांना यश प्राप्त झाले.

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ठाना पेट्रोल पंप येथिल देशी दारूचे दुकान, परमात्मा एक सेवक डेली निडस, हनुमान मंदिर जवळील आचल स्टेशनरी दुकानाचे शटर तोडून व इतर साहित्य घेऊन चोरट्यांनी भंडारा शहराकडे निघाले हे सर्व सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने पोलीसांना आरोपींना पकडण्यात यश आले.

आशुतोष उर्फ लकी (अमर नगर, नागपूर), मनीष चौधरी (कौशल्या नगर, नागपूर) आणि विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेण्यात आले. तिन आरोपींचे नाव निष्पन्न झाले असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. पोलीस स्टेशन भंडारा, जवाहरनगर, कारधा येथे जबरी घरफोडी केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीशकुमार चिंचोळकर पोलीस निरीक्षक (स्था.गु.शा.), सुभाष बारसे पोलीस निरीक्षक भंडारा, गणेश पिसाळ पोलीस निरीक्षक पो. स्टेशन कारधा, सुधीर बोरकुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जवाहरनगर, नारायण तुरकुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक (स्था.गु.शा.),व पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार यांनी आरोपींचा शोध घेतला.

error: Content is protected !!