रेल्वेच्या धडकेत हरणाच्या पाडसाचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत हरणाच्या पाडसाचा मृत्यू

तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील घटना

तुमसर, २८ एप्रिल :- मुंबई-हावडा मार्गावरील तुमसर रोड रेल्वे स्थानकातील अप ट्रॅक क्रमांक तीनवर पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या हरणाच्या पाडसाला भरधाव रेल्वेने धडक दिली. यात पाडसाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार पहाटे ५:३० च्या दरम्यान घडली. हरणांच्या कळपातून हे पाडस भटकले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अप मार्गावर तुमसर रोड रेल्वेस्थानकावर रेल्वेने हरणाच्या पाडसाला धडक दिल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. काही अंतरापर्यंत हरणाचे पाडस रेल्वे ट्रॅकच्या समांतर धावत होते. रेल्वेचालकाने हॉर्न वाजविल्यामुळे ते पाडस भेदरले. रेल्वे ट्रॅक पार करताना त्याला अखेर रेल्वे इंजिनची धडक बसली. तुमसर रोड रेल्वे स्थानकातील रेल्वे जीआरपीने घटनेचा पंचनामा करून तुमसर वन विभागाला याबाबत माहिती दिली. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी आता थेट गावात येत असल्याचे या घटनेवरून सिद्ध होत आहे.

error: Content is protected !!