ब्रम्हपुरी, सिंदेवाही, पाथरी, पारडीत महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा

ब्रम्हपुरी, सिंदेवाही, पाथरी, पारडीत महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा

ना. धर्मरावबाबा आत्राम, खा. अशोक नेते, अतुल देशकरांची उपस्थिती

गडचिरोली/चंद्रपूर, ११ एप्रिल :- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ १० एप्रिलला ब्रम्हपुरी येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृह, सिंदेवाही येथील तालेवार सभागृह, सावली तालुक्यातील पाथरीच्या चौकात आणि गडचिरोली तालुक्यातील पारडी येथे महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला.

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, उमेदवार तथा खा. अशोक नेते आणि अतुल देशकर यांनी या दौऱ्यात तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या एकत्रित मेळाव्याला उपस्थित राहून निवडणूक व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले.

बुथस्तरीय यंत्रणेपासून सर्वांनी कोणत्या पद्धतीने कामे करावी, या मतदार संघात कोणकोणती कामे झाली याची माहिती देण्यासोबत, भाजपच्या नेतृत्वातील केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामे आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवून जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासात्मक कामांना गती देण्यासाठी महायुतीलाच कौल द्या, असे आवाहन खा. नेते, ना. आत्राम आणि अतुल देशकर यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, डॉ. कोडवते, राष्ट्रवादीचे नेते विनोद नवघडे, शिवसेना संपर्क प्रमुख वर्षा मोरे, कि.आ.प्र. नेते रमेश भूरसे, ओबीसी जिल्हाध्यक्ष अविनाश राऊत, राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, शिवसेनेचे नेते हेमंत जम्बेवार, आरपीआयचे नेते संतोष रामटेके, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वंदना शेंडे, अरविंद नांदुरकर, तालुकाध्यक्ष अरून शेंडे, युवा नेते तनय देशकर, ओबीसी नेते प्रकाश बगमारे, तालुकाध्यक्ष राजू बोरकर, तालुकाध्यक्ष अविनाश पाल, महामंत्री सतीश बोमावार, संतोष तंगडपलीवार, तुकाराम ठीकरे, दिलीप ठीकरे, शरद सोनवाने, किशोर वाकुडकर, अर्जून भोयर, अरून पाल, विनोद धोटे, मोहन ठाकरे, संजय निखारे, अमिता मडावी, डॉ. बलवंत लाकडे, कमलाकर शिद्ममशेटीवार, नागराज गेडाम, राष्ट्रवादीचे रिंकु पापडकर, गणवीर, सलीम पठाण, देवराव कोठेकर, योगिता डबले, मनिषा चिमूरकर, छाया शेंडे, निलम सुरमवार, पुष्पा शेरकी, तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!