कुजलेल्या अवस्थेत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

कुजलेल्या अवस्थेत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

तालुक्यात खळबळ 

गोरेगाव, ०२ मे :- गोंदिया-गोरेगाव मार्गावरील हिरडामाली गावशिवारातील नाल्यात एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही घटना मंगळवारी (ता. ३०) दुपारी १२ वाजता सुमारास निदर्शनास येताच तालुक्यात एकच खळबळ उडाली. अज्ञात इसमाची आत्महत्या की घातपात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोरेगाव पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

गोरेगाव-गोंदिया या मुख्य मार्गावरील हिरडामाली नाल्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पोलिसांनी तुर्त मर्ग दाखल करून मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. सदर इसमाची आत्महत्या की हत्या? असा सवालही उपस्थित होवू लागला आहे.

error: Content is protected !!