लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

भंडारा, 04 मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 -11 भंडारा-गोंदिया मतदार संघात 19 मार्च, 2024 रोजी मतदान पार पडले आहे व 4 जून, 2024 रोजी या निवडणूकीचे निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन सभागृह येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या उपस्थितीत निवडणूक मतमोजणीबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

4 जून, रोजी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मत मोजणीसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत उपस्थित राहावे. प्रशिक्षणासाठी नियुक्त निवडणूक कर्मचाऱ्यांना मतमोजणी बाबत माहिती देण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक पिसाल, उपजिल्हाधिकारी लीना फलके, जिल्हा नियोजन अधिकारी रा.न. बोरकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मजमोजणीचे काम एक्सल शीटमध्ये करावे. कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन लीना फलके यांनी केले.

error: Content is protected !!