भाजपा पंचायत राज व ग्रामविकास नागपुर विभाग सहसंयोजक पदी अर्चना बोरकुटे यांची नियुक्ती

भाजपा पंचायत राज व ग्रामविकास नागपुर विभाग सहसंयोजक पदी अर्चना बोरकुटे यांची नियुक्ती

गडचिरोली, 31 डिसेंबर :- भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग नागपूर विभाग सहसंयोजक पदी अर्चना बोरकुटे (चुधरी) यांची नियुक्ती प्रदेश संयोजक गणेशकाका जगताप यांनी केली. यावेळी प्रदेश संयोजक गणेशकाका जगताप, प्रदेश सहसंयोजक, राजीवजी शर्मा, प्रदिप बोबडे, प्रदेश मिडिया प्रमुख आंनदराव चौडकर यांचे उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. अर्चना बोरकुटे या भारतीय जनता पक्ष गडचिरोली तालुका महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष तथा साखरा ग्राम पंचातीच्या उपसरपंच आहेत. तसेच विविध क्षेत्रात त्यांनी सामाजिक व राजकीय कार्य केले आहेत. याची दखल घेत पक्षाने त्यांची नियुक्ती केली.

त्यांच्या निवडीबद्दल खासदार अशोक नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष योगिता भांडेकर, जिल्हा भाजपा महामंत्री प्रमोद पिपरे, गोविंद सारडा, रवि ओल्लालवार, प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा संयोजक विलास दशमुखे, तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, राजु खंगार, लोमेश कोलते आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!