दारूसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त ; दोन आरोपींना अटक

दारूसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त ; दोन आरोपींना अटक

आष्टी पोलिसांची कारवाई 

आष्टी, ३१ डिसेंबर :- २९ डिसेंबरला रात्री चंद्रपूरवरुन आष्टी येथून एक स्कॉर्पिओ गाडी क्र. एमएच ३१ डीसी ६८१६ मधून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी येथील फॉरेस्ट नाक्यावर सापळा रचून सदर गाडी थांबविली व त्या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये १ लाख, ६० हजार रुपयाची दारू व एक पांढऱ्या रंगाची जुनी स्कॉर्पिओ गाडी किमत अंदाजे पाच लाख असा एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी प्रमोद महादेव दुर्योधन (३७ वर्षे) आणि मुकुंदा गंगाराम चालूलकर (५४ वर्षे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. एक आरोपी फरार आहे.

सदर कारवाई पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ज्ञानेश्वर सराफ, पोलिस शिपाई अविनाश कारशेट्टीवार, पोलिस शिपाई अतुल तोडासे, पोलिस शिपाई कुंडलिक चौधरी यांनी केली.

error: Content is protected !!