आष्टी-आलापल्ली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मोबदला – माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रयत्नांना यश

आष्टी-आलापल्ली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मोबदला – माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रयत्नांना यश

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाची दाखल घेत पंचनामा केला सुरू 

गडचिरोली, १३ डिसेंबर :- आष्टी ते आलापली राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 या तलाठी कार्यालय साजा क्र. 9 मधील बोरी, राजपूर पॅच, शिवनीपाठ या गावातील शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करत आहेत. मात्र गेल्या वर्षापासून सूरजागड येथील लोह खनिज उत्खनन करून दररोज हज़ारों ट्रक ये-जा करत असल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतीवर पूर्णतः धूळ पसरत असल्याने शेतातील उभे कापूस, धान पिके नष्ट होऊन शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत.

तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली होती. त्यानुसार महसूस विभाग व कृषि विभाग कडून सर्व्हे केले होते. मात्र मोबदला मिळाला नसून थातुर-मातूर सर्व्हे करण्यात आले होते.

त्यामुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार सहित शेतकरी बांधवांनी तहसीलदार यांना पुन्हा निवेदन देण्यात आले असून येत्या 12 डिसेंबर पर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांचे सर्व्हे करून योग्य मोबदला देण्यात यावा अन्यथा उपोषण करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले होते. निवेदनाची दखल घेत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी मोबदला देण्याचे जाहीर केले असून जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले असून शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.

निवेदन देताना माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार सहित माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी शंकर कोडापे, बोरीच्या सरपंच मीना वेलादी, सरपंच राजपूर पॅच पराग ओल्लालवार, उपसरपंच बोरी सुरेश गंगाधरीवार, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सुरेश आदे, गोपाळ आदे, चंदु मोहुर्ले, बळवंत आदे, नागेश मोहूर्ले, मीना कावळे, रुपेश चांदेकर, सतीश दैदावार, विलास निकेसर, नागेश वेलादी, शंकर पम्पेलवार, शायलू मडावी, प्रभाकर मडावी, मारोती मडावी, नितीन गुंडावार, अजय मडावी, शोभा मडावी, मधुकर वेलादी, शंकर कम्पेलवार, रुपेश चांदेकर, शंकर निकेसार, बापू ठाकरे, रामुलु कुळमेथे, मधुकर वेलादी, जितेंद्र शेंडे, सुरेश आदे, सुरेश निकेसर, नागेश मोहूर्ले, रामभाऊ आदे, गोपाळा आदे, पेंटू अलोने, सुरेश आडे, गोपाळा आदे, चंदू मोहूर्ले, प्रभाकर वेलादी, मारोती मडावी, अजय मडावी, नागेश मोहूर्ले, भीमराव कॅम्पेलवार, पतरू ठाकरे, दसरू निकोडे सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!