शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे – आ. डॉ. देवराव होळी

शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे – आ. डॉ. देवराव होळी

गडचिरोली येथील जिल्हा कृषि महोत्सवाचे विधान परिषदेचे आ. डॉ. रामदास आंबटकर यांचे हस्ते उद्घाटन

गडचिरोली, 13 डिसेंबर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर शेतकरी या स्वप्नपूर्तीसाठी शेतीला व्यवसायाची जोड आवश्यक आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील जिल्हा कृषि महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक विधान परिषदेचे आमदार डॉ. रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी संजय मीणा, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. संदीप कऱ्हाळे, शेतकरी तथा भाजपाचे किसान आघाडीचे नेते रमेश भुरसे, जिजामाता कृषी पुरस्कार विजेत्या भाजपाच्या नेत्या प्रतीभा चौधरी, अनिल पोहनकर, श्रीकांतजी पतरंगे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की, आपल्या गडचिरोली जिल्ह्यात केवळ शेतीतून एकदाच बारमाही पीक घेतो. यामुळे आपल्याकडे शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याचे दिसून येत नाही. आपल्या शेतामधून वेगवेगळ्या प्रकारचे लहान लहान शेतीपूरक उद्योग आहेत, व्यवसाय आहेत त्यांना आपण आपल्या शेतीला जोडल्यास त्या व्यवसायातून आपली आर्थिक गरज मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ वार्षिक बारमाही शेतीवर अवलंबून न राहता शेतीला पूरक असे लहान लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी मनाचा निर्धार करावा व त्या व्यवसायाकडे वळावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

error: Content is protected !!