दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एक जागीच ठार, तीन जखमी

दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एक जागीच ठार, तीन जखमी

आष्टी येथील को-आपरेटिव्ह बॅंक समोरील घटना

आष्टी, ०४ मे :- दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना 3 मे रोजी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आष्टी येथे घडली. अमोल रोहणकर (वय 28) रा. किष्टापुर ता. चामोर्शी असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मृत अमोल रोहणकर हा लग्न समारंभात राळापेठ येथे गेला होता. कार्यक्रम आटोपून आपली दुचाकी क्र. एमएच ३३ झेड १०२८ ने तो परत किष्ठापूर आपल्या स्वगावाकडे जात असताना आष्टी-चामोर्शी मार्गावरील को-ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर अनखोडा येथुन येत असलेल्या दुचाकी क्र एमएच ३३ झेड ००३४ या दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली. यात अमोल रोहणकर याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सागर दुर्गे (वय २३) रा. अनखोडा, गुलचंद दुर्गे (वय १४), वंश दुर्गे (वय १२) दोन्ही रा. छल्लेवाडा ता. अहेरी हे किरकोळ जखमी झाले.

घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले व मृतकाला आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

error: Content is protected !!