व्यंकटापुर येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन

व्यंकटापुर येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन

अहेरी, ३१ डिसेंबर :- उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर येथे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांचे संकल्पनेतून व उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व नम्रता फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  ३० डिसेंबर रोजी भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून हिंगोलीचे पोनि शेंदरे व प्रमुख पाहुणे म्हणून नम्रता फाऊंडेशन नागपूर टीमचे अविनाश, नम्रता, सुप्रिया, डिंपल, आवलमारीचे उप सरपंच चिरंजीव, आश्रमशाळा आवलमारीचे अधिक्षक कोंडे, आडे, पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलिस पाटील व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोउपनि संजय कुकलारे, पोउपनि काळे तसेच व्यंकटापूर पोलिस स्टेशन हद्दीतील 150 ते 200 नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

सदर जनजागरण मेळाव्या दरम्यान सर्व उपस्थित नागरिकांना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोउपनि संजय कुकलारे यांनी पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करून कल्याणकारी शासनाच्या विविध योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पोउपनि काळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालकांचे लैगिंक अत्याचारापासून सरंक्षण कायदा व बालकाचे सरंक्षण व काळजी कायद्याबत मार्गदर्शन केले.

सदर जनजागरण मेळाव्या दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना व गरजू नागरिकांना साड्या 50 नग, लुंगी 50 नग, प्लॅस्टिक टोपली 50 नग, प्लॅस्टिक बकेट 40, पाण्याच्या बॉटल 50 नग, नोट बुक 70 नग, पेन्सिल शॉपनर खोडरबर पट्टी (मिनी कंपास) 70 नग, आभा कार्ड 100, पॅन कार्ड अपलोड 27, आधार कार्ड अपडेट 65, 7/12 उतारे वाटप 125, आधार मतदान कार्ड लिंक 70, इ-श्रम कार्ड 3 इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.

सदर भव्य जनजागरण मेळाव्यात मान्यवरांना, नागरिकांना व विद्यार्थ्यांना अल्पोपहार व चहाची व्यवस्था करण्यात आली. सदर मेळाव्याचा 150 ते 200 ग्रामस्थांनी लाभ घेतला. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन मपोशि वरगंटीवार यांनी केले व उपस्थितांचे आभार पोहवा आत्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोउपनि चौधरी, पोहवा सडमेक, निलम, तोडासे, गावडे, पोना पुंगाठी, पोशि. जेंगठे, कुंभरे, साराय्या पटले, मानपुरे, मपोशि वरगंटीवार, चेतना, आत्राम, कोराम, कार्तिक, सर्व जिल्हा व एसआरपीएफचे अधिकारी, अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!