तलावात उडी घेऊन महिलेची आत्महत्या

तलावात उडी घेऊन महिलेची आत्महत्या

गडचिरोली, 31 डिसेंबर :- शहरातील चंद्रपूर मार्गावरील तलावात महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. पुष्पा हजारे (45) रा. गांधी वार्ड असे मृतक महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा हजारे हिची मागील अनेक दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती. या आजाराला कंटाळून तिने शुक्रवारी दुपारच्या सुमारास तलावात उडी घेऊन घेतली. घटनेची माहिती प्राप्त होताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठित मृतदेह तलावातून बाहेर काढित पंचनामा केला. याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार गुरनुले करीत आहेत.

error: Content is protected !!