नवीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोन मजूर गंभीर जखमी

नवीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोन मजूर गंभीर जखमी

गडचिरोली शहरातील घटना 

गडचिरोली, ३१ डिसेंबर :- शहरातील लाजरी साडी सेंटरच्या नविन इमारतीच्या सज्जाचा स्लॅब कोसळल्याने या दुर्घटनेत दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. जखमींना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेमंत केशव गेडाम व लक्ष्मण नानाजी जेंगठे अशी जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली शहरातील आठवडी बाजारालगत आसलेल्या लाजरी साडी सेंटरच्या बाजूला गेल्या काही दिवसांपासून या दुकानाच्या नविन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शक्रवारी दिवसभर समोरील सज्जासाठी स्लॅब टाकण्यात आले. दरम्यान, मजूर इमारतीवरुन खाली उतरत असतानाच अचानक स्लॅब कोसळला. घटना घडताच स्लॅबच्या मलब्याखाली एक मजूर बराच वेळ दबून होता दर दुसऱ्याला तातडीने बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. एवढी मोठी घटना घडूनही इमारत मालकाने आपले दुकान सुरूच ठेवले होते. यामुळे जमावामध्ये संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर दुकान बंद करण्यात आले. अपघातस्थळी नागरिकांनी एकच गर्दी जमली होती. सज्जाचे स्लॅब टाकताना सेंट्रींग कमकुवत वापरल्याने स्लॅबच्या भारामुळे दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. जखमी मजूरांच्या उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी केली आहे.

error: Content is protected !!