लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली, १६ मार्च :- संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुक 2024 च्या तारखा अखेर आज जाहीर करण्यात आल्या आहेत. अखेर देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर केल्या. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे.

19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. यावेळी निवडणुकीत 97 कोटी मतदार मतदान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात एकूण 10.5 लाख मतदान केंद्र असतील तर 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कधी होणार मतदान :-

पहिला टप्पा- १९ एप्रिलला मतदान
गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक (५)

दुसरा टप्पा- २६ एप्रिलला मतदान
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (८)

तिसरा टप्पा- ७ मे रोजी मतदान
रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (११)

चौथा टप्पा- १३ मे रोजी मतदान
नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड, नगर (११)

पाचवा टप्पा- २० मे रोजी मतदान
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईचे सहा (१३)

सहावा टप्पाः 25 मे रोजी मतदान

सातवा टप्पाः 1 जून रोजी मतदान

निकालः 4 जून रोजी

दरम्यान, पत्रकार परिषदेत नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह हे दोघेही आज निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना उपस्थित होते.

error: Content is protected !!