रोजगार हमी योजनेतून १८५ मजुरांना मिळाला रोजगार

रोजगार हमी योजनेतून १८५ मजुरांना मिळाला रोजगार

कुकडी येथे रोपवाटिका निर्मितीचे काम सुरु

आरमोरी, २४ एप्रिल :- तालुक्यातील आदिवासीबहुल ग्रामसभा कुकडी (मोहटोला) येथे रोजगार हमी योजनेंतर्गत नैसर्गिक रोपाच्या एकेरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली असून, गावातील १८५ मजुरांना रोजगार मिळाला आहे.

खरीप धानाची फसल निघाल्यानंतर गावात कोणतेच कामधंदे व रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांच्या रिकाम्या हाताना काम मिळावे म्हणून रोहयो अंतर्गत नैसर्गिक रोपाचे एकेरीकरण हे काम सुरू करण्यात आले. रोहयो कामामुळे स्थानिक मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने मजुरांना दिलासा मिळाला आहे. ग्रामसभा कुकडीच्या वतीने मनरेगांतर्गत नैसर्गिक रोपांच्या एकेरीकरण कामाचा प्रारंभ वैरागडचे क्षेत्र सहायक के.एस. पिल्लारे यांच्या हस्ते करण्यात आला. शासन निर्णय सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांना रोजगाराची संधी उपलब्ध करून रोजगारासोबतच वनाचे संवर्धन व व्यवस्थापन करण्यासाठीदेखील मदत होईल, असा सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती, कुकडीने विश्वास व्यक्त केला आहे. याप्रसंगी पुरुषोत्तम किरंगे, रोजगार सेवक, पोलिसपाटील, ग्रामसभा समितीचे सर्व सदस्य व कामावरील मजूर उपस्थित होते.

error: Content is protected !!