स्पर्श संस्थेच्या वतीने 7 खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन कान्सेनट्रेटरचे वाटप

स्पर्श संस्थेच्या वतीने 7 खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन कान्सेनट्रेटरचे वाटप

गडचिरोली, 30 एप्रिल :- येथील स्पर्श संस्थेच्या वतीने शहरातील ७ खासगी रुग्णालयांना मुव्हेबल ऑक्सिजन कान्सेनट्रेटर तसेच विविध वैद्यकीय साहित्य भेट स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले.

गडचिरोली शहरातील धन्वंतरी रुग्णालय, सिटी हॉस्पिटल, अप्पलवार आय हॉस्पिटल, मार्कंडेय हॉस्पिटल, प्राईम हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल, रुदया संस्थेचे मुस्का येथील हॉस्पिटल यांना स्पर्श संस्थेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून १० आणि ५ लिटर क्षमतेचे मुव्हेबल ऑक्सिजन कान्सेनट्रेटर, ऑक्सि-पल्स मीटर, इन्फ्रारेड थर्मल गन आदी साहित्य देणगी रुपात देण्यात आले. राजस्थान येथील बिंदी इंटरनेशनल या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यातील दुरदुरच्या गावातून अनेक रुग्ण या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येतात. आकस्मिक प्रसंगी रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यास रुग्णालयांनी या सामाजिक जाणीवेतून रुग्णावर उपचार करावे अशी अपेक्षा स्पर्शचे अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे यांनी व्यक्त केली.

मुव्हेबल ऑक्सिजन कान्सेनट्रेटर मुळे फिरत्या वाहनातून रुग्णावर उपचार करणे सहज शक्य होईल असे डॉ. हेमंत अप्पलवार यांनी सांगितले. या ऑक्सिजन कान्सेनट्रेटरचा वापर करून रुग्णावर उपचार केला गेल्यास रुग्णांकडून ऑक्सिजनचे शुल्क घेतले जाणार नसल्याचे डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. प्रशांत चलाख, डॉ. बाळू सहारे, डॉ. यशवंत दुर्गे व डॉ. राजश्री देवगडे यांनी सांगितले. वैद्यकीय साहित्याच्या या देणगी बद्दल डॉ. अनंत कुंभारे, डॉ. वैशाली चलाख, डॉ. वृषाली अप्पलवार, डॉ. अद्वय अप्पलवार, रुदया संस्थेचे काशिनाथ देवगडे यांनी स्पर्श संस्थेचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!