चुरमुरा येथील भागवत सप्ताहाला खा. अशोक नेते यांची सदिच्छा भेट

चुरमुरा येथील भागवत सप्ताहाला खा. अशोक नेते यांची सदिच्छा भेट

आरमोरी, २२ एप्रिल :- तालुक्यातील चुरमुरा येथे श्रीराम नवमी महोत्सव व हनुमान जयंतीच्या निमित्ताने रामायण व श्रीमद् भागवत‌ गीता ज्ञानयज्ञ भागवत सप्ताह मोठया आनंद उत्साहाने गावातील नागरिक एकत्रित येऊन भक्ती भावनेने पुजा अर्चा करत भागवत कथा प्रवचनकार ह.भ.प.सौ. माधुरीताई बालपांडे यांच्या संपूर्ण संगीतमय संचासह धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या भागवत सप्ताह कथेच्या निमित्ताने खा. अशोक नेते यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी  गावातील नागरिकांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ते म्हणाले,    अशा धार्मिक कार्यक्रमाची आज गरज असून अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले पाहीजे. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मन शुद्ध स्वच्छ व निर्मळ ठेवावे. यातून चांगले विचार, चांगले आचार आत्मसात करून फलित करावे. या भागवत सप्ताहाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन खासदार अशोक नेते ‌यांनी केले.

यावेळी माजी सरपंच मुखरु देशमुख, माजी सरपंच बोबाटे, तंमुस अध्यक्ष दशरथ सोनटक्के, माजी उपसरपंच धुरंधर सातपुते, कवडु म्हस्के, विजय शेंडे, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!