रेती व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या

रेती व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या

गोंदिया येथील घटना

गोंदिया, २३ एप्रिल :- गोंदियातील रिंगरोड स्थित हनुमाननगर येथील रहिवासी गोलू ऊर्फ रोहित हरिप्रसाद तिवारी (वय ३६) तिवारी यांची सोमवारी रात्री १० च्या सुमारास गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेने रेती व्यवसायिकात दहशत निर्माण झाली असून अवंती चौकातील सहयोग रुग्णालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान शहरात सहयोग हॉस्पिटल समोर तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. प्राप्त माहितीनुसार, गोलू तिवारी हे सोमवारी रात्री दुचाकीने तिरोडा येथून गोंदियाकडे येत होते. दरम्यान त्यांच्या पाठीमागे एका दुचाकीवर दोन जणांनी त्यांचा पाठलाग करून गोळीबार केला. दरम्यान गोलू तिवारी यांनी जीव वाचवण्यासाठी आपल्या दुचाकीचा वेग वाढविला. कुडवा चौकापासून काही अंतरावर असलेल्या एका बारसमोर त्यांची दुचाकी स्लिप झाली. आधीच त्यांना गोळी लागली असल्याने आणि दुचाकी स्लिप झाल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला गोलू तिवारीला उपचारासाठी रिंग रोड परिसरातील सहयोग हॉस्पिटल येथे दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या घटनेची माहिती होताच गोलू तिवारी यांच्या मित्रमंडळींनी सहयोग हॉस्पिटलकडे धाव घेतली. तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने रुग्णालय परिसरात रामनगर पोलिस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत होते. रेती घाटाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोलल्या जात आहे.

error: Content is protected !!