महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, कारंजा येथे रंगीत तालीम

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, कारंजा येथे रंगीत तालीम

गोंदिया, 29 एप्रिल :- 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्या निमित्ताने दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा येथे निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 29 एप्रिल रोजी सकाळी 8.00 वाजता 1 मे महाराष्ट्र दिनाची पुर्वतयारी म्हणून रंगीत तालीम घेण्यात आली.

यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) नंदिनी चानपूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर, तहसिलदार समशेर पठाण, मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अमृतराज पाटील, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे यांचेसह एन.एम.डी. कॉलेजचे एन.सी.सी.चे विद्यार्थी, जिल्हाधिकारी कार्यालयातील मंजू गजभिये, अमोल गजभिये, मध्यम प्रकल्प विभागाचे किशोर ढवळे, गुरुनानक शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका मंजुश्री देशपांडे तसेच पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

1 मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या रंगीत तालीममध्ये मुख्य अतिथींचे आगमन, शासकीय ध्वजारोहण, राष्ट्रध्वजास मानवंदना, मुख्य अतिथींकडून परेडचे निरीक्षण, मुख्य अतिथींचे उपस्थितांना शुभेच्छा संदेश, पथ संचलन, मुख्य अतिथींची उपस्थित मान्यवरांशी भेट, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, मुख्य अतिथींचे प्रस्थान यांचा यात समावेश होता. यासोबतच पोलीस कवायत मैदान, कारंजा येथील किल्ल्याची रंगरंगोटी, मैदानाची साफसफाई, अतिथींची बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उन्हाचे दिवस असल्यामुळे सावलीसाठी पेंडॉलची व्यवस्था, अचानक कोणाला काही चक्कर वगैरे आली तर प्रथमोपचार सुविधा उपलब्ध ठेवण्यात यावी इत्यादी बाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!