अमृतसर (पंजाब) येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय महाअधिवेशन

अमृतसर (पंजाब) येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय महाअधिवेशन

05 मे रोजी नागपूर येथे आढावा बैठक

नागपूर, २९ एप्रिल :-  07 ऑगस्ट 2024 ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन पंजाब राज्यातील येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने नागपूर येथे रविवार, 5 मे रोजी दुपारी दुपारी 12 वाजता धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर रुम न. 10 मध्ये बैठकीचे आयोजन कऱण्यात आले आहे. या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी. ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रीमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रीमिलेयरची मर्यादा 20 लाख रुपये करण्यात यावी. मंडल आयोग आणि स्वामिनाथ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या. ओबीसी प्रवर्गाचा ॲट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा. व इतर मागण्या मजूर करून घेण्यासाठी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वर्षभरातील कार्यक्रम ठरविण्यासाठी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

उपरोक्त बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ,महिला महासंघ, युवा-युवती महासंघ, कर्मचारी महासंघ, किसान महासंघ, विद्यार्थी महासंघ, वकील महासंघ तसेच सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र कार्यकारिणी, विदर्भ कार्यकारिणी, सर्व जिल्हाध्यक्ष व सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे अवाहन राष्ट्रीय ओबीसी महांघाचे महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव प्रा. देवानंद कामडी, कोषाध्यक्ष डॉ. सुरेश लडके, जिल्हा संघटक सुरेश भांडेकर, चंद्रकांत शिवणकर, महिला जिल्हाध्यक्षा संगीता नवघडे, मंगला कारेकर, युवा जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर आदींनी केले आहे.

error: Content is protected !!