दोन वाहनातून १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त 

दोन वाहनातून १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; चार जण ताब्यात 

गडचिरोली, ०३ मे :- येथील गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेऊन दोन वाहनातून तब्बल १८ लाख २७ हजाराचा सुगंधीत तंबाखू जप्त केला आहे. सदर कारवाई गुरुवारी आरमोरी तालुक्यातील वैरागड मार्गावर ठाणेगाव टी पाईंट जवळ करण्यात आली. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शासनाने सुगंधीत तंबाखूच्या विक्रीवर बंदी घातली असतांनाही गडचिरोली जिल्हयात चोरट्या मार्गाने छत्तीसगड राज्यातून तंबाखूची वाहतूक करून तो पानठेलेचालक व दुकानदारांना विकला जातो. यासंदर्भात आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील गंगाधर चिचघरे हा कुरखेडा वैरागड मार्गावर दोन वाहनातून सुगंधीत तंबाखूची वाहतूक करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली.

या माहितीच्या आधारे गुरुवारी ठाणेगाव टी पाईंट जवळ पाळत ठेवली असता समोरून दोन वाहने येतांना दिसली. या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तंबाखू आढळून आला. याप्रकरणी गंगाधर चिचघरे, सोमेश्वर चिचघरे, महेश भुरसे व अमोल भुरसे सर्व रा. ठाणेगाव यांना ताब्यात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सुर्पूद करण्यात आले. सदर कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी नरेश सहारे, अकबशहा पोयाम, प्रशांत गरफडे, श्रीकृष्ण परचाके, श्रीकांत बोईना, दीपक लोणारे यांनी केली.

error: Content is protected !!