आयबीएन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी यांची आदर्श पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी निवड

आयबीएन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी यांची आदर्श पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी निवड

गडचिरोली, ०३ मे :- गेली तीस वर्षे गडचिरोली जिल्ह्यात पत्रकारिता करणारे न्यूज 18 लोकमतचे गडचिरोलीचे जिल्हा प्रतिनिधी व्हॉईस ऑफ मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे राज्य प्रवक्ता महेश तिवारी यांना महाराष्ट्र संपादक परिषदेचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचा शेवटचा टोक गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा टोक असलेल्या तेलंगणाच्या सीमेवरील सिरोंचा येथील मूळ रहिवासी असलेले महेश तिवारी यांनी गेली 30 वर्ष गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अनेक समस्यांसह या जिल्ह्यात असलेला माओवाद या भागातल्या वेगवेगळ्या घडामोडी जगासमोर आणण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले आहे.

1995 पासून दैनिक लोकसत्ताच्या माध्यमातून पत्रकारिता सुरू करणारे महेश तिवारी यांनी ईटीव्ही मराठी या वाहिनीसाठी दोन वर्ष हैदराबादच्या ईटीवीच्या मुख्यालयात संपादकीय विभागातही काम केले आहे. 2001 डिसेंबर पासून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचे ईटीव्ही मराठीचे संयुक्त जिल्हा प्रतिनिधी म्हणून महेश तिवारी यांनी पत्रकारिता करत असताना या दोन्ही जिल्ह्यातील अनेक विषयांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा पासून कोरची पर्यंत दुर्गम भागातील अनेक गावातील मूलभूत सोयी आरोग्याच्या समस्या यासह या भागात होणाऱ्या माओवाद्यांच्या हिंसक कारवाया माओवादी संघटनेची कार्यपद्धती, पोलीस आणि माओवादी या दोघांमध्ये होणाऱ्या संघर्षात निर्माण होणारी परिस्थिती महेश तिवारी यांनी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दैनिक लोकसत्तासह महाराष्ट्र टाइम्सच्या नागपूर आवृत्ती सुरू झाल्यापासून गडचिरोलीचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना अनेक विषयांकडे महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून महेश तिवारी यांनी लक्ष वेधले आहे. 2013 मार्चपासून आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियातील नवा प्रवास महेश तिवारी यांनी सुरू केला आहे. आयबीएन लोकमतचे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना स्वतंत्र तेलंगणा राज्याचे आंदोलन कव्हर केल्यानंतर अस्तित्वात आलेल्या तेलंगणा राज्याची पहिली विधानसभा निवडणुकीचे वृत्तांकन त्यानंतर आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे वृत्तांकन महेश तिवारी यांनी केले आहे.

छत्तीसगडच्या तीन विधानसभा निवडणुकीत थेट सुकमा दंतेवाडा सारख्या अतिसंवेदनशील भागात जाऊन जीव धोक्यात घालून विशेष बातम्या महेश तिवारी यांनी केल्या आहेत. यापूर्वी राज्य शासनाचे विशेष पुरस्कार, विधिमंडळ आणि मंत्रालय वार्ताहर संघाचा इलेक्ट्रॉनिक मीडियासाठीचा सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारही महेश तिवारी यांनी पटकावला आहे. महेश तिवारी यांना संपादक परिषदेचा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!