पिकअपची दुचाकीला धडक ; एक महिला ठार 

पिकअपची दुचाकीला धडक ; एक महिला ठार 

एक जखमी ; कारगिल चौकातील घटना

गडचिरोली, ०३ मे :- नादुरुस्त ट्रॅक्टर-ट्रॉली पिकअपला बांधून नेत असताना पिकअप वाहनाने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एक महिला ठार, तर एक युवक गंभरी जखमी झाल्याची घटना २ मे रोजी गुरुवारी सायंकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास शहरातील मुल मार्गावर कारगिल चौकात घडली. विशेष म्हणजे आपल्या लहान मुलाचे लग्न आटोपून सावलीकडे परत जाताना नवरदेवाच्या आईचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रेखा नामदेव राऊत (वय ४४) रा. सावली, जि. चंद्रपूर असे मृत महिलेचे नाव आहे, तर दुचाकीस्वार बंडू भलवे (२७) रा. सावली हा जखमी झाला. अपघात घडल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत दोनही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, रक्तबंबाळ झालेल्या रेखा राऊत या महिलेचा मृत्यू झाला, तर जखमी बंडू भलवे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सावली येथील नामदेव राऊत यांच्या दोन मुलांचे लग्न होते. अमित राऊत नामक मोठ्या मुलाचे लग्न १ मे बुधवारी सावली येथे पार पडले, तर २ मे रोजी लहान मुलगा अविनाश राऊत याचे लग्न रांगीनजीकच्या निमगाव येथे होते. हे लग्नकार्य आटोपून नवरदेवाची आई रेखा राऊत ही दुचाकीवरून गडचिरोलीमार्गे सावलीकडे जात होती. दरम्यान, कारगिल चौकात पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिली.

error: Content is protected !!