तोडसा ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात माजी आ. दिपक आत्राम यांनी दोड्डी येथे केली कार्यकर्त्यांसोबत चर्चा

तोडसा ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात माजी आ. दिपक आत्राम यांनी दोड्डी येथे केली कार्यकर्त्यांसोबत चर्चा

एटापल्ली, 13 डिसेंबर :- तालुक्यातील तोडसा ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक आत्राम यांनी काल रात्री दोड्डी येथे उमेदवारांचा प्रचार करून तद्नंतर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आदिवासी विद्यार्थी संघाचे पॅनलचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी परीश्रम घेण्याचे आवाहन केले.

यावेळी दोड्डी येथे कार्यकर्त्यांसोबत व आविसं पॅनलचे उमेदवारांसोबत चर्चा करताना माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे सोबत आविसं तालुका अध्यक्ष नंदु मट्टामी, माजी जि.प. सदस्य संजु चरडूके, माजी पं.स. सदस्य मंगेश हलामी, आविसं तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, आविसं तालुका सचिव नानेश गावडे, कोकण सरकार, पॅनलचे उमेदवार मंगेश गावडे, पोलीस पाटील रैनू मट्टामी, माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख, संदीप बडगे, नदीम सय्यद सह आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!