वेलतुर तुकुम येथील दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

वेलतुर तुकुम येथील दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

२६ टिल्लू देशी दारू जप्त

चामोर्शी, २४ एप्रिल :- तालुक्यातील वेलतूर तुकूम येथील दारू विक्रेत्यास देशी दारूसह चामोर्शी पोलिसांच्या स्वाधीन केल्याची कृती गावातील महिला व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.

वेलतुर तुकुम येथील अवैध दारूविक्री बंदीसाठी गाव संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. गावातील दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती, सूचना करून अवैध व्यवसाय बंद करण्याची तंबी देण्यात आली आहे. तरी सुद्धा गावातील एक विक्रेता शेतशिवारात अवैध दारूची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे गाव संघटनेच्या महिलांनी शेतशिवारात शोधमोहीम राबविली असता, सदर विक्रेत्याकडे २६ टिल्लू देशी दारू मिळून आली. या घटनेची माहिती मुक्तिपथ तालुका चमू व चामोर्शी पोलिसांना देण्यात आली. त्यांनतर गाव संघटनेच्या महिलांनी दारूसह दारू विक्रेता छ्त्रपती धोटे यास पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी पंचनामा करून संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी अनुसया दहलकर, माया फाले, मंगला नायबनकर, साधना बानबले, सुनिता पाल, उर्मिला धोटे, तंमुस अध्यक्ष भक्तदास कोहपरे, यामिना चौधरी, रीना देशमुख यांच्यासह इतर गावातील महिला, मुक्तिपथ तालुका प्रेरक विनोद पांडे, पल्लवी चुधरी उपस्थित होते.

error: Content is protected !!